
महाराष्ट्र
मुंबई जगातील तिसरे सर्वाधिक प्रदूषित शहर! हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI) १६६ वर; नागरिकांच्या आरोग्याची चिंता वाढली.
मुंबईतील वायुप्रदूषणात वाढ झाली असून, IQAir च्या अहवालानुसार १२२ शहरांच्या यादीत मुंबई तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगण्यात आले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे हवेच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र
गोकुळमध्ये २५ पैकी २५ जागा जिंकणार! ऋतुराज पाटील यांचा समविचारी आघाडीच्या विजयाचा दावा
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समविचारी आघाडीकडून माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह ठरावधारकांनी शक्तिप्रदर्शन केले. सर्व ठरावधारक बंटी साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी २५ पैकी २५ उमेदवार निवडून येतील, असा दावा केला.

महाराष्ट्र
इचलकरंजी हादरले ! ९ वीच्या विद्यार्थिनीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने माणगावात घबराट
इचलकरंजी हादरले !
९ वीच्या विद्यार्थिनीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळल्याने माणगावात घबराट
माणगांव येथे ९ वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. घातपाताच्या संशयावरून पोलिसांनी तपास सुरू केला असून श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार हा हत्येचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्र
ग्रेटर नोएडात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू चहा आणि नूडल्समधून विषबाधा झाल्याचा संशय; घटनेने खळबळ
उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील नगला श्री पदमी गावात एकाच कुटुंबातील पाच जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. मृतांमध्ये महेश, त्यांची पत्नी ललिता आणि त्यांची तीन मुले यांचा समावेश आहे. चहा आणि नूडल्स खाल्ल्यानंतर विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.